प्रधानमंत्री आवास योजनेची सर्व घरे सौर ऊर्जेवर, मोफत विजेची….

मुंबई दि १५ — प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल तीस लाख इतकी घरे मंजूर करण्यात आली आहेत, ती देशात सर्वाधिक आहेत यातून सर्व दुर्बल घटकातील जाती जमातींना घरे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली , ही सर्व घरे मोफत वीज उपलब्ध होणारी असतील.
याबाबतचा मूळ प्रश्न संतोष दानवे यांनी उपस्थित केला होता, त्यावर गोपीचंद पडळकर यांनी उपप्रश्न विचारला. गेल्या सात वर्षांत आपण तेरा लाख घरे बांधली मात्र यावेळी विक्रमी तीस लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी वीस लाख घरांची कामे सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व घरांना सत्तर टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे, त्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, याचा आढावा महसूल मंत्री आणि ग्रामविकास मंत्री लवकरच घेतील असं मुख्यमंत्री म्हणाले. ही सर्व नवीन घरे सौर ऊर्जेवर चालतील त्यासाठी त्यांना पन्नास हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, त्यामुळे ही सर्व घरे मोफत वीज उपलब्ध होणारी असतील असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. ML/ML/MS