सौरऊर्जेने उजळणार उत्तरकाशी बोगद्यातून वाचलेल्या कामगारांची घरे

 सौरऊर्जेने उजळणार उत्तरकाशी बोगद्यातून वाचलेल्या कामगारांची घरे

उत्तरकाशी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तरकाशीमध्ये बोगद्यात १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांची अविरत प्रयत्नांनंतर सुखरुप सुटका झाली आहे. खडतर स्थितीत तग धरुन राहीलेल्या या कामगारांच्या असामान्य धैर्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून त्यांना मदतीचा हात मिळत आहे. या कामगारांची घरे आता सौरऊर्जेने उजळणार आहेत. सूरत तेथील सौर कंपनी गोल्डी सोलर या बाधित कामगारांच्या घरी सौर यंत्रणा बसवणार आहे. गोल्डी सोलर हा भारतातील सर्वात दर्जेदार सोलर ब्रँड आहे. कंपनी हाय-एंड फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स बनवते आणि स्पर्धात्मक किमतींवर ईपीसी सेवा प्रदान करते.

गोल्डी सोलरने अधिकृतपणे सांगितले की, कंपनी बोगद्यातून बाहेर पडलेल्या उत्तरकाशीतील सर्व 41 कामगारांच्या घरांवर सौर पॅनेल बसवणार आहे. या माध्यमातून त्यांना त्या कामगारांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रकारे धैर्याने या संकटाचा सामना केला आहे त्याचा सन्मान करायचा आहे. या कामगारांच्या आणि कुटुंबांच्या धैर्याला सलाम करत कंपनीने त्यांच्या घरात प्रकाश आणून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गोल्डी सोलरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन ईश्वर ढोलकिया म्हणाले, या सर्व कामगारांच्या सुरक्षित परतण्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्याकडून हा एक छोटासा उपक्रम राबवला जात आहे. या द्वारे सर्व कामगारांच्या कुटुंबियांना मदत करता येईल. गोल्डी सोलर याआधीही देशातील ग्रामस्थ आणि आदिवासींना मदत करत आहे.

गोल्डी सोलर कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत विविध शिक्षण, कौशल्य विकास आणि समुदायांच्या उन्नतीसाठी शाश्वत जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी आदर्श समाजात योगदान देण्यावर आणि व्यवसायापलीकडे लोकांचे जीवन सुधारण्यासाठी काम करते.

SL/KA/SL

4 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *