Housefull 5’ चा टीझर रिलीज

मुंबई, दि.१ : ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5 teaser) चा बहुप्रतिक्षित टीझरनुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘हाऊसफुल 5’ मध्ये टीझरमध्ये एकूण 18 कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, फरदीन खान, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रणजित, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर अशी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते.
साजिद नाडियाडवाला यांचा ‘हाऊसफुल’ (Housefull) हा सुपरहिट चित्रपट 30 एप्रिल 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली.