RRR पाहण्यासाठी अमेरिकेतील चित्रपटगृह हाऊसफुल

 RRR पाहण्यासाठी अमेरिकेतील चित्रपटगृह हाऊसफुल

लॉस एंजेलीस, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या देशभरातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या RRR या चित्रपटाने आता जगभरातील लोकांना वेड लावले आहे. RRR मधील नाटू नाटू या गाण्याला यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे. विशेष म्हणजे ऑस्कर पुरस्कार प्रदान कार्यक्रमात या डान्सचे लाईव्ह सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली आहे.
आरआऱआर चित्रपटाचे अमेरिकेतील एका थिएटरमध्ये स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. यावेळी तब्बल दोन हजार आसनांचे हे थिएटर हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.

याआधी नाटू नाटू या गाण्याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये पार पडलेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात RRR मधील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजन सॉंग हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नाटू नाटू हे तेलगु भाषेतील गाणे एम. एम. किरवाणी यांनी कंपोज केले आहे. राहूल सिप्लीगंज आणि काल भैरवा यांनी गायलेले हे गाणे एनटी रामाराव ज्युनिअर आणि रामचरण यांच्या धम्माल डान्स परफॉर्मन्सवर चित्रित करण्यात आले आहे.

SL/KA/SL
1 March. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *