रत्नागिरीत महिला चालविणार हाऊसबोट

रत्नागिरी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुरत्न हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश महिला सक्षमीकरण आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महिलांना हाऊसबोट देण्यात आली आहे. परिणामी, भेट देणाऱ्या पर्यटकांना हाऊसबोट चालवणाऱ्या महिलांना पाहण्याची संधी मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या विकासामुळे जिल्ह्याच्या पर्यटन वाढीस मोठा हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असल्याने प्राणी संग्रहालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याच्या सर्वात उंच पुतळ्याचा उद्घाटन सोहळा 4 तारखेला होणार आहे, त्यासोबतच देशातील पहिला 3D मल्टीमीडिया शो येथे दाखवला जाणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी एकत्र काम करतोय. सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमिनतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल आणि त्याला विमान प्रवास करता येईल. विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर असेल त्याचबरोबर अन्य ९ शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
काजू बोर्डाचे ५ वर्षासाठी १३०० कोटी मंजूर केले आहेत. आंबा बोर्ड असावे, अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्वता मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते निलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिध्दी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंब्रे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रृती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी १ लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी. के. एल. वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यांनतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. Houseboats will be driven by women in Ratnagiri
ML/KA/PGB
27 Jan 2024