जपानमधील टोल यंत्रणा ३८ तास ठप्प, तरीही हजारो नागरिकांनी भरला कर

टोकीयो, दि. २८ : जपानमधील एका अनोख्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील टोल वसुली यंत्रणा अचानकपणे ३८ तासांसाठी ठप्प झाली होती, त्यामुळे कार चालवणाऱ्या नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करता आला नाही. ही तांत्रिक बिघाडाची घटना एका सर्व्हरच्या अपयशामुळे घडली, ज्यामुळे ऑटोमेटेड टोल गेट्स आणि डिजिटल पेमेंट प्रणाली एकदम बंद पडली. या परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना प्रवासाची स्वतः नोंद ठेवून यंत्रणा सुरू झाल्यावर टोल भरण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, या अडचणीच्या काळात हजारो नागरिकांनी स्वतःहून टोल भरला. काही जणांनी GPS लॉग, डॅशकॅम फुटेज आणि हस्तलिखित पावत्या ठेवून प्रवासाचे दस्तावेज तयार केले. तर काही नागरिकांनी यंत्रणा सुरू होण्याच्या आधीच ऑफलाइन काउंटरवर जाऊन कर भरला. तब्बल २४ हजारहून नागरिकांनी प्रामाणिकपणे कर भरला आहे. हे वर्तन जपानी समाजातील नैतिकता, जबाबदारी आणि कायद्याच्या पालनाच्या संस्कृतीचे सजीव चित्र दाखवतं.
प्रशासनानेही या प्रामाणिकपणाचं कौतुक करत ही घटना भविष्यकालीन धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं मान्य केलं. आयटी तज्ञांच्या मदतीने तातडीने काम सुरू करून यंत्रणा सुरळीत करण्यात आली. याशिवाय, आगामी काळात अशा बिघाडांवर मात करण्यासाठी बॅकअप प्रणाली आणि पारदर्शकता वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचं व्यापक कौतुक होत असून #JapanHonesty सारखे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले आहेत. जगभरातील लोक या घटनेविषयी चर्चा करत असून, नागरी जबाबदारी आणि प्रामाणिकपणाच्या व्याख्या पुन्हा नव्याने मांडल्या जात आहेत. हाच समाज मूल्यांचा आदर्श आहे, जो कोणत्याही प्रगत राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत ठरतो.
SL/ML/SL