होंडा लाँच करणार स्वस्त इलेक्ट्रिक बाईक

मुंबई, दि. २२ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया भारतात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय पेटंट ऑफिस (IPO) मध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. यावरून असे दिसून येते की, कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे, जी शाईन १०० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन बाईक बनवताना वेळ आणि पैसा वाचवण्याची होंडाची योजना आहे. यासाठी ते शाइन १०० चे चेसिस वापरेल. त्यात काही बदल करून इलेक्ट्रिक सेटअप बसवला जाईल. यामुळे नवीन बाईकची किंमतही कमी राहील आणि ती लवकर बाजारात येईल.
पेटंट कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, या बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक मोटर आणि काढता येण्याजोगा बॅटरी पॅक असेल. या बॅटरी अॅक्टिव्हा ई-स्कूटरप्रमाणे स्वॅप करण्यायोग्य असतील. म्हणजेच, तुम्ही त्या चार्जिंग स्टेशनवर सहजपणे बदलू शकाल. ई-अॅक्टिव्हा प्रमाणे, प्रत्येक बॅटरीचे वजन सुमारे १०.२ किलो असते आणि बाईकच्या मध्यभागी बसणारे दोन बॅटरी पॅक असतील.
SL/ML/SL