या बँकेचे गृहकर्ज झाले स्वस्त

 या बँकेचे गृहकर्ज झाले स्वस्त

मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःचे घर घेण्यासाठी गृहकर्जाची तजवीज करण्याच्या चिंतेत असलेल्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅकने रेपो दरात ४ टक्के दर वाढ केली आहे. यानंतर बहुतांश बँकांनी कर्ज महाग केली आहेत. मात्र बॅक ऑफ बडोदाने काही निवडक ग्राहंकांसाठी गृहकर्जाच्या व्यादरात कपात केली आहे. याचा फायदा बॅकेच्या हजारो ग्राहकांना मिळणार आहे. Bank of Baroda.

बँकेने काही निवडक ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजदरात २५ बेसिस पाँईंट्सची कपात केली आहे.यानुसार बँक ऑफ बडोदाच्या गृहकर्जाचे व्याजदर ८.२५ टक्क्यांपासून सुरु झाले आहेत. घटलेले सुधारित व्याजदर आजपासून १४ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. याचा फायदा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे.

बँक ऑफ बडोदाने व्याजदरातील विशेष सवलत नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी खुली केली आहे. एखाद्या ग्राहकाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज हस्तांतरित करायचे असल्यासही, संबंधित ग्राहकाला नव्या व्याजदराचा फायदा मिळू शकतो. बँकेने कर्जावरचे प्रोसेसिंग शुल्कही काढून टाकले आहे. मात्र कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवरही ते अवलंबून राहणार आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन व्याजदर हे इतर कोणत्याही बँकेतील व्याजदरापेक्षा स्पर्धात्मक आहेत.

SL/KA/SL

14 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *