अयोध्येच्या मशिदीसाठी मक्केतून आली पवित्र वीट, सोन्याने लिहिलेले कुराण

 अयोध्येच्या मशिदीसाठी मक्केतून आली पवित्र वीट, सोन्याने लिहिलेले कुराण

अयोध्या, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील महिन्यात अभूतपूर्व सोहळ्याद्वारे अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर शेकडो वर्षे सुरु असलेल्या रामजन्मभूमी संघर्षाला विराम मिळाला आहे. अयोध्या आता जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पणानंतर आता मुस्लीम पक्षाला दिलेल्या जागेवर अयोध्येतील राम मंदिरापासून थोड्या अंतरावर भव्य मस्जिद उभारण्याचे काम सुरु होणार आहे. ही भव्य मस्जिद जगभरातील लोकांच्या आर्कषणाचे केंद्र बनणार आहे. इस्लामच्या सिद्धांतावर आधारीत पाच मिनार असणाऱ्या या मस्जिदीसाठी बांधकामासाठी पवित्र वीट एप्रिल महिन्यात अयोध्येत पोहचणार आहे. या वीटेवर सोन्याने पवित्र कुराणचे आयेत कोरण्यात आले आहेत.

रामनगरी अयोध्येत तयार होणाऱ्या या मशिदीत केशरी रंगाचे कुराण देखील ठेवण्यात येणार आहे. येथे येणारे श्रद्धाळुंना गंगा जमूना सभ्येतेचे अनोखे दर्शन घडविणार आहे. 29 फेब्रुवारीला मुंबईत एका कार्यक्रमात या वीटेला ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर या वीटेला अजमेर शरीफ येथे नेण्यात येईल. धन्नीपूर येथे ‘मोहम्मद बिन अब्दुला’ मशिदीची निर्मितीची जबाबदारी पाहणाऱ्या इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन द्वार आयोजित कार्यक्रमानुसार या वीटेला एप्रिल महिन्यात अयोध्येत पाठविण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमीवर तयार होणाऱ्या राम मंदिरानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच एकर जागेवर भव्य मशिदीचे काम सुरु होणार आहे. ईदनंतर एप्रिल महिन्यात या मशिदीचे काम सुरु होणार आहे. यासाठी पवित्र काळ्या मातीची वीट अयोध्येत पोहचणार आहे. या पवित्र वीटेवर सोन्याने कुराणाचे आयते कोरण्यात आले आहे. या पवित्र वीटेला मक्का शरीफ आणि मदिना शरीफ मध्ये जमजमच्या पवित्र पाणी आणि अंतराने तिला शुचिभूर्त केलेले आहे. वीटेच्या समोरच्या बाजूला कुराणाची आयते आणि चारी बाजूला इस्लाम नबी सोन्याने लिहिलेली आहेत.

अयोध्येतील राम जन्म भूमीचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने धन्नीपूर गावात मस्जिद उभारण्यासाठी पाच एकर जमिन देण्यासाठी सरकारला आदेश दिले होते. यावरुन सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने एक समिती नेमली. मोहम्मद बिन अब्दुल्ला मस्जिद मध्ये एक हॉस्पिटल, शिक्षणाचे केंद्र देखील असणार आहे. तसेच 9 हजार क्षमतेचे नमाज पढण्याचे ठिकाणही असणार आहे. या मस्जिदचे नाव इस्लामचे शेवटचे पैगंबर ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला’ यांच्या नावावर ठेवले आहे. या मशिदीच्या बांधकामात इस्लामच्या पांच पिलर्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच मिनारे उभी करण्यात येतील. कलमा ( शपथ ), नमाज ( प्रार्थना ), हज ( मक्केची यात्रा ), जकात ( दान ), आणि रोजा ( उपवास ) याचे प्रतिनिधीत्व म्हणून पाच मिनारे असणार आहेत.

SL/KA/SL

7 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *