मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना ६ डिसेंबरला सुट्टी

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर
केली असून,मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे.

शासनाने सुट्टीसंबंधी काढलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी ‘अनंत चतुदर्शी’च्या दिवशी आणि 2007 पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्तान मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आता 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 6 डिसेंबरला देशभरातील लाखो भीम अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत दाखल होतात. यानिमित्ताने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

SW/KA/SL

5 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *