दीक्षाभूमीवर पंचशील ध्वजाचे रोहण

नागपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने दीक्षाभूमी येथे मुख्य कार्यक्रमाच्या स्थळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेला गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळेला बुध्द वंदना घेण्यात आली तसेच समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देखील देण्यात आली. कार्यक्रमाला स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
ML/KA/SL
23 Oct. 2023