दीक्षाभूमीवर आज पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण…
नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर आज दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दल यांचा उपस्थितीत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात मुख्य स्टेज समोर पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे जवान, बौध्द अनुयायी उपस्थित होते.
याप्रसंगी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पंचशिल ध्वजाला सामुहिक मानवंदना देण्यात आली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध , जय भीम चा जयघोष करण्यात आला.. उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी साजरा केला जाणार असल्याने दीक्षाभूमीवर आजपासूनच हजारों बौध्द अनुयायी दाखल होऊ लागले आहे. बौध्द अनुयायांना प्रशासनातर्फे विविध आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.