पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासाठी अकलूज येथील ग्रामीण कलाकार एकत्रित आले आहेत. या चित्रपटाची नुकतीच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मुहूर्त करून घोषणा करण्यात आली.

अश्विनी महांगडे ह्या अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तर सुशांत सोनवले हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून तर सोमनाथ शिंदे हे लयभारी प्रोडक्शन च्या माध्यमातून चित्रपटाची निर्मिती करीत आहे. संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा , अनिल नगरकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक कलाकार या चित्रपटात अभिनय करणार आहेत.

अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचा संपूर्ण जीवनपट आता अकलूजचया मातीतून रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी यांचा जाज्वल्य इतिहास आता नवीन पिढीला पहायला मिळणार आहे.History of Punyashlok Ahilya Devi Holkar now on silver screen

ML/KA/PGB
20 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *