CBSC अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त 68 शब्दांत
नवी दिल्ली, दि. १२ : CBSE च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास अवघ्या ६८ शब्दांत मांडण्यात आल्याचा आरोप अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेत केला. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर फक्त ६८ शब्दांत माहिती असणे, ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले.
आमदार सत्यजीत तांबे यांनी आज सकाळी विधानपरिषदेतील अर्धातास चर्चेत सहभाग घेतला. त्यात त्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत संक्षिप्त स्वरुपात मांडण्यात आल्याचा संताप व्यक्त केला. तसेच सरकारला पेटून उठण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर फक्त 68 शब्दांत माहिती आहे. ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत खेदाची बाब आहे.
ते पुढे म्हणाले, सीबीएसई बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांत सांगत असेल तर सरकारने पेटून उठले पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणी स्वतः अभ्यासक्रम तयार करून तो सीबीएसई बोर्डाला सादर करण्याची गरज होती. आम्ही तुम्हाला छत्रपतींचा इतिहास लिहून देतो, तुम्ही त्याचा तुमच्या अभ्यासक्रमात समावेश करा, असा प्रयत्न या प्रकरणी सरकारकडून करण्याची गरज होती, असे सत्यजीत तांबे म्हणाले.
SL/ML/SL