ऐतिहासिक रंगपंचमी आणि रहाड रंगोत्सव झाला साजरा…

 ऐतिहासिक रंगपंचमी आणि रहाड रंगोत्सव झाला साजरा…

नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये रंगपंचमी आणि ऐतिहासिक रहाड रंगोत्सव साजरा करण्यात आला. देशात अनेक ठिकाणी होळी नंतर धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा असताना महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी होळी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे यामध्ये नाशिकच्या रंगपंचमीला विशेष महत्त्व असून नाशिकमध्ये रंगपंचमीनिमित्त रहाड रंगोत्सव विशेषता फक्त जुन्या नाशिकमध्येच साजरा होतो .

ऐतिहासिक काळामध्ये अटकेपार झेंडे लावणारे मराठी शासक पेशवे हे उत्सवप्रिय म्हणून देखील प्रसिद्ध होते. विविध उत्सवाबरोबर पंचमी देखील केशवराज उत्साहात साजरी होत असे, नाशिक मध्ये इतिहासातील बराच मोठा काळ पेशव्यांचे राज्य आणि पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजे बहाद्दर यांनी शासन केले. नाशिक मधील रहाड रंगोत्सव हा इतिहासकालीन असून अशा प्रकारचा बहुधा एकमेव रंगोउत्सव आहे . देशभर सर्वत्र धुळवड अथवा रंगपंचमीला रंग उत्सव साजरा करताना एकमेकांच्या अंगावर रंग उडविण्याची पद्धत आहे परंतु जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाड म्हणजेच सर्वसाधारणतः 12 फूट खोल आणि मोठे मोठे रुंद असे सहा दगडी हौद आहेत फुल, पाने तसेच नैसर्गिक रंगापासून विशिष्ट पद्धतीचा रंग आणि त्यामध्ये आयुर्वेदिक औषधी मिसळून रंग तयार केला जातो. या रंगाच्या हौदामध्ये डुबकी मारल्यानंतर उन्हाळ्यात होणारे त्वचा आणि इतर प्रकारचे आजार होत नाहीत अथवा नियंत्रणात राहतात अशी नाशिक करायची धारणा असून नाशिककर नागरिक विशेषतः तरुण-तरुणी या राहडीत डुबकी मारून रंगपंचमी साजरी करतात .

अलीकडे 50 – 60 वर्षांच्या काळामध्ये नाशिककरांना पाच रहाडी परिचित होत्या, परंतु रंगपंचमीच्या अवघ्या काही दिवस आधी नाशिक मध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना मधली होळी या जुन्या नाशिक मधील परिसरात आणखी एक पेशवेकालीन बारा फूट खोल रहाड सापडली. या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सदर पेशवेकालीन रहाड जतन करण्याचा निर्णय घेतला आणि स्मार्ट सिटी प्रशासनाला सदरहा रहाड नष्ट न करण्याची विनंती केली. स्मार्ट सिटी प्रशासनाने देखील त्यांची विनंती मान्य करून आपल्या कामाची दिशा बदलली .

सदर रहाडी साधारण 80 ते 90 वर्षांपूर्वी रंगपंचमीसाठी उपयोगात आणत परंतु कालांतराने सदर रहाड नाशिककरांच्या विस्मरणात गेल्याचे आणि वयोवृद्ध सांगतात त्यानंतर यावर्षी या सुमारे 80 ते 90 वर्षानंतर सापडलेल्या या रहाडी मध्ये रंगोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा रंगोत्सव साजरा करण्याची जबाबदारी मधली होळी तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी घेऊन आज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी रहाड उत्सव साजरा करण्यात आला. अनेक टेकड्यांवर वसलेल्या जुन्या नाशिकच्या या परिसरातील एका टेकडीवर आजूबाजूला जुने वाडे अत्यंत अरुंद चढाचे रस्ते अशी अवघड भौगोलिक परिस्थिती असताना देखील होणारी रंगप्रेमींची गर्दी नियंत्रणात आणण्याचे आणि रंगोत्सव यशस्वी साजरा करण्याचे जबाबदारीचे काम मधली होळी तालीम संघाने आणि पोलीस प्रशासनाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

चेंगराचेंगरी अथवा अन्य कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून रहाडीत डुबक्या मारण्यासाठी तरुण-तरुणींची रांग लावून त्यांना डुबकी मारण्यासाठी सोडले जात होते तसेच राहडीत उड्या घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची मधली ओळी तालीम संघाचे कार्यकर्ते काळजी घेऊन त्याला सुरक्षित बाहेर काढत होते . यामध्ये महिला आणि तरुणींचा समावेश देखील मोठ्या प्रमाणात होता. पोलीस प्रशासनाने ही या ठिकाणी खबरदारीचे उपायोजना केली. नवीन सापडलेल्या मधली होळी रहाडीच्या रंगोत्सवाप्रमाणे शहरातील पंचवटी, शनि चौक, दंडे हनुमान चौक, तिवंधा चौक,
दिल्ली दरवाजा आणि जुनी तांबट गल्ली या ठिकाणीही रहाड उत्सव प्रचंड जल्लोषात साजरा झाला. अनेक वर्षांनी सापडलेल्या पेशवेकालीन ऐतिहासिक राडीच्या उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी परिसरातील नागरिक आणि नाशिक शहरातील जुने पुरोहित यांनी विशेष दक्षता घेतली.

आज सकाळी 11 वाजेपासून या ठिकाणी विविध पूजा आणि धार्मिक विधी करण्यात आले तसेच गोदावरी आणि अन्य ठिकाणचे पवित्र जल पालखीतून मिरवणुकीने रहाडीच्या ठिकाणी आणून त्याची विधिवत पूजन करून हे जल रहाडीत ओतल्यानंतर नैसर्गिक आणि आयुर्वेदिक साधनांपासून तयार करण्यात आलेला गुलाबी रंग या रहाडीत तयार करण्यात आला . नाशिक शहरातील सहा रहाडी मध्ये परंपरेनुसार विविध प्रकारचे वेगळे वेगळे रंग वापरण्याची पद्धत आहे नाशिककरांनी आजच्या रंगपंचमीचा उत्साह विविध प्रकारच्या रहाडीमध्ये डुबकी मारून आणि आणि डीजेच्या तालावर रंग खेळून उत्साहात साजरा केला. आजच्या रंगोत्सव कोणतीही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी नाशिक पोलीस होमगार्ड आणि प्रशासनाने विशेष दक्षता घेतली.

Historical Rangpanchami and Rahad Rangotsav celebrated…

ML/ML/PGB
30 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *