श्रद्धा जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदूंची एकजूट

 श्रद्धा जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदूंची एकजूट

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या श्रद्धेला ठेच पोहोचत असून प्रसादाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. भाविकांचे आणि हिंदू धर्माचे हे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली असून योग्य आणि आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या आहेत. प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून होणार आहे.

मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित रहावी यासाठी हिंदुत्व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. हिंदूंच्या आराध्याला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा सात्विक आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये अशुद्ध घटक वापरले जात नाहीत ना याची खात्री केली जाणार असून त्यानंतरच ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे.

या प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक क्षेत्र आहे. येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मंदिराबाहेर प्रसादाची अनेक दुकानं असून या दुकानांमधील प्रसादात भेसळ किंवा कोणत्याही वर्ज्य पदार्थाचा वापर होत नाही ना याची पाहणी केली जाणार आहे. सर्व व्यवस्थित असलेल्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ज्यायोगे भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ सुरू केली आहे. याची सुरुवात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे. महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री यांनी या चळवळीबद्दल बोलताना म्हटलं आहे की, प्रसाद अशुद्ध असेल तर त्याचे फळ विपरीत मिळते.

मंदिराबाहेर मिळणाऱ्या प्रसादामध्ये अनेकदा विधर्मी व्यक्तिंद्वारा भेसळ केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. प्रसादात बनावट तूप, इतरही काही पदार्थ, गाईची चरबी वापरल्याच्या घटना घडत असल्याचे वृत्त समोर येत असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि हिंदू धर्मियांचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ काम करणार आहे. गुरुवार, १४ जून २०२४ ला या चळवळीचा शुभारंभ होणार आहे.

ML/ML/SL

13 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *