हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि १६ : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या प्रवर्गामधील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
अनुदान योजना – या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 7 आहे. ही योजना 50 हजार रूपये पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रूपये हे अनुदान म्हणून व 25 हजार रूपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थीला दिले जाते.
बीज भांडवल योजना – या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 7 आहे. ही योजना रू. 500001 ते 5 लाखापर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे बीज भांडवल 20 टक्के व अनुदानाचा रू. 50000/- चा समावेश आहे.
थेट कर्ज योजना – या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 3 आहे. ही योजना एक लाख रूपयांची असून महामंडळाची बीज भांडवल रक्कम 75 हजार रूपये व अनुदान रक्कम 20 हजार रूपये पर्यंत दिले जाते. लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.
अर्जदारांनी www. Hindu Khatik Samaj Economic Developemnt Corporation Ltd.gov.in या बेवसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन पदध्तीने भरून महामंडळाकडील सर्व योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मा. जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड संभाजीनगर सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2325659 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.KK/ML/MS