हिंदू संघटनांनी मागितली घारापुरी शिवमंदिरात पूजेची परवानगी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून समुद्रात काही अंतरावर वसलेल्या घारापूरी बेटावर जगप्रसिद्ध लेणी आहेत. पुरातत्वखात्याच्या अखत्यारित असलेल्या या जग प्रसिद्ध पर्यटन स्थळाला मुंबईला भेट देणारे देश-विदेशातील पर्यंटक मोठ्या संख्येने भेट देतात. घारापुरी लेण्यांमध्ये भव्य त्रिमूर्ती असलेले शिवलेणी पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. या लेण्यांमध्ये असलेल्या शिवलिंगाची तसेच शिवमुर्तींची पुजा-अर्चा करता यावी आणि हे ऐतिहासिक स्थळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदु संघटनांनी केली आहे.
पुरातत्व खात्याच्या नियमानुसार याला परवानगी नाही. युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या या घारापुरी लेणीतील हे प्राचीन शिवमंदीर येथे शिवलिंग असलेली गर्भगृहे पाहायला मिळतात. या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती, सुदर्शन वाहिनी आणि स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या पुढाकारानं शिवलिंगाची पुजा आणि आरती करण्यात आली.
पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेल्या या अतिशय पुरातन लेण्यांमध्ये भगवान शंकराची विविध रुपे पाहायला मिळतात. येथे पूजा-अर्चा किंवा कोणतेही धार्मिक विधी करण्यास सध्या परवानगी नाही. मात्र, स्थानिक गावकरी येथे महाशिवरात्रीला आस्थेप्रमाणे पूजा करतात. इथे नियमित पूजा करण्याचा अधिकार हिंदुंना मिळावा ही मागणी आता हिंदु संघटना करत आहेत.
SL/KA/SL
18 Feb. 2024