महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार ‘ पाषाण ‘ ला जाहीर
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पत्रकार, कवी प्रशांत डिंगणकर यांच्या “पाषाण” या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.प्रशांत डिंगणकर यांची “दगड” या विषयावर साडेतीन हजार शब्दांची मराठीत दीर्घ कविता सन 2017 ला प्रकाशित झाली, त्याला मराठी वाङमयाचे पुरस्कार ही मिळाले. त्याच कवितेचा हिंदी भावानुवाद प्रशांत डिंगणकर यांनी केला असून त्याचे “पाषाण” या नावाने दिव्य प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर (सुवर्ण) पुरस्कार घोषित झाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांसह जीवन गौरव आणि कथा, कादंबरी, कविता, अनुवाद अशा विविध 13 गटात साहित्य अकादमीने पुरस्कार घोषीत केले आहेत.
ML/KA/PGB 7 March 2024