अंगावर हिजाब, खाद्यांवर भगवा झेंडा, मुस्लिम युवती आयोध्येकडे …

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खांद्यावर भगवा ध्वज, पाठीवर राम मंदिराचा फोटो आणि अंगावर हिजाब परिधान केलेली ही युवती शबनम शेख आहे. रामाच्या भक्तीत लीन झालेली ही तरुणी मुंबईवरुन अयोध्येला निघाली आहे.
सुमारे १५७५ किलो मीटरचे अंतर ती आपल्या दोन मित्रांसोबत गाठणार आहे. अयोध्यात प्रभूरामाचे दर्शन घेणार आहे. मुंबईवरुन पायी जाणाऱ्या या शबनम शेख हिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. शबनमने आतापर्यंत अडीचशे किलोमीटर अंतर कापत नाशिक जिल्ह्यातून तिचा पायी प्रवास सुरू आहे. शबनमच्या या प्रवासात अनेक जन तिच्यासोबत फोटो काढून तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. तिच्या या प्रवासात खान पानाची व्यवस्था करण्यासाठी लोक मदत करत असल्याचे तिने सांगितले.
अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शबनम पाठीवर बॅग घेऊन आपल्या दोन मित्रांसह मुंबई येथून पायी निघाली आहे. तिच्यासोबत बिनित पांडे आणि रमनराज शर्मा असे तिचे दोन मित्र आहे. रामायण आणि प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आपणास खूप आस्था असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. त्याचप्रमाणे अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची आपली महत्वकांक्षा असल्याचे शबनमने सांगितले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेळ दिल्यास आपण त्यांची भेट घेणार असल्याचे शबनम हिने सांगितले.
शबनम हिला रामलल्लाचे दर्शन करायचे आहे. स्वत:ला ती सनातनी मुस्लिम म्हणत आहे. लहाणपणापासून शबनमला रामायणाची गोडी लागली. महाभारत धारवाहिक तिने पूर्ण पाहिली आहे. रामायण आणि महाभारताचा तिच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. ती प्रभू रामाला आपले आदर्श मानते. तिच्या या अयोध्या यात्रेला घरच्या लोकांनीही प्रोत्साहन दिले असल्याचे तिने सांगितले. अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेऊन अयोध्येतील धन्नीपूर येथे तयार होत असलेल्या मशिदीत ती जाणार आहे. या माध्यमातून आपली दोन्ही धर्मात आस्था असल्याचा संदेश ती देणार आहे.Hijab on body, saffron flag on food, Muslim girl to Ayodhya…
ML/KA/PGB
26 Dec 2023