ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आजवरची सर्वाधिक FRP मंजूर
![ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आजवरची सर्वाधिक FRP मंजूर](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/06/Sugarcane-Farmers.jpg)
नवी दिल्ली, दि. २८( एमएमसी न्यूज नेटवर्क):
केंद्र सरकारने देशातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) मोठा दिलासा दिला आहे. आज (28 जून) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (CACP) यापूर्वीच सरकारला याची शिफारस केली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारनेही त्यास मान्यता दिली आहे. Highest ever FRP sanctioned to sugarcane farmers
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. सरकारने वाढवलेला एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. हा एमएसपी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून पुढील वर्षी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहे. 2021 मध्ये उसाचा एमएसपी 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आला. 2022 मध्ये त्यात 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये करण्यात आली. आता 10 रुपयांनी वाढ झाल्याने नव्या हंगामात उसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असून साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे, राज्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे.
SL/ KA/ SL
28 June 2023