श्री शनी शिंगणापूर देवस्थानची उच्चस्तरीय चौकशी

 श्री शनी शिंगणापूर देवस्थानची उच्चस्तरीय चौकशी

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदनगर जिल्ह्यातील श्री शनी शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळाद्वारे बेकायदेशीर रित्या करण्यात आलेल्या 1800 कर्मचाऱ्यांची भरती आणि विश्वस्त मंडळावर होत असलेल्या विविध आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करून विशेष ऑडिट करणार असल्याची घोषणा आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली , या संदर्भातील लक्षवेधी सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली होती.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले की, श्री शनी शिंगणापूर देवस्थान मध्ये 1800 कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसून या संदर्भात त्यांनी कोणतीही जाहिरात दिली नाही याशिवाय सर्व कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे . देवस्थानावर होत असलेल्या आरोपांसदर्भात सहायक धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत विसंगती आढळून येत असून त्यांनी योग्य प्रकारे चौकशी केली नाही.

त्यामुळे या प्रकरणातील विविध आरोपांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय श्री शनेश्वर देवस्थान मध्ये विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा लागू करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमत्र्यांशी चर्चा करून कायद्याच्या अंमलबजावणी
बाबत निश्चित तारीख आणि आदेश लागू करू असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.. High level inquiry of Shri Shani Shingnapur Temple

ML/KA/PGB
19 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *