राहुल गांधीना दिलासा देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

सुरत, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांच्य याचिकेवर सुनावणी दरम्यान म्हटले की, त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला जाऊ शकत नाही. आम्ही या प्रकरणावर उन्हाळी सुट्टीनंतर निकाल देऊ. राहुल गांधी यांनी सूरत कोर्टाच्या निकालाविरोधात २५ एप्रिल रोजी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान मार्चमध्ये राहुल गांधी यांना २०१९ च्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.
SL/KA/SL
2 May 2023