प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्रीवर बंदीस उच्च न्यायालय अनुकूल

 प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्रीवर बंदीस उच्च न्यायालय अनुकूल

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या फुलांचा वापर आणि विक्री यांवर बंदी घालण्याची अनुकूलता मुंबई उच्च न्यायालयाने दर्शवली आहे. यासंदर्भात येत्या चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

याचिकाकर्ते ग्रोअर्स फ्लॉवर्स कौन्सिलने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पॅकेजिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा दाखला दिला आहे. प्लास्टिकच्या फुलांची जास्तीतजास्त जाडी ३० मायक्रॉन आणि किमान २५ मायक्रॉन आहे. जी १०० मायक्रॉनपेक्षा कमी आहे, असे याचिकेत नमूद करण्याा आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ८ मार्च २०२२ रोजी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील असीम नाफडे यांनी न्यायालयाला सांगितले. पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत, प्लास्टिकच्या १०० मायक्रोनपेक्षा कमी जाडी असलेल्या फुलांच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारला आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

High Court favors ban on use and sale of plastic flowers

ML/ML/PGB
6 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *