या राज्यात मंदीरात मोबाईल वापरास न्यायालयाकडून बंदी
चेन्नई,दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्ये तेथील मंदीरांमधील स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मंदीरात प्रवेश करताना घालायची वस्त्रे आणि अन्य उपचारांबाबतही कसोशीने काळजी घेतली जाते. मंदिरात फोनमुळे मन एकाग्र होत नाही. मूर्तींचे फोटो काढले जातात, तसेच महिलांचेही त्यांच्या अपरोक्ष फोटो घेतले जातात, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच मंदीराचे पावित्र्यही धोक्यात येते, अशी याचिका एका व्यक्तीने दाखल केली होती. याची दखल घेत मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाइल फोनवर बंदी घातली आहे.
Madras High Court Bans Mobile Phones In Temples Across Tamil Nadu
SL/KA/SL
4 Dec. 2022