मूड ठिक करण्यासाठी इथे मिळते १० दिवसांची ‘सॅड लिव्ह’

 मूड ठिक करण्यासाठी इथे मिळते १० दिवसांची ‘सॅड लिव्ह’

बिजिंग, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभर प्रचंड काम केल्यावर एक दिवसाची हक्काची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटते. ही एक दिवसाची सुट्टी देखील पुढील आठवड्याचे नियोजन करण्यासाठी आणि घर आवरण्यातच निघून जाते. त्यामुळे शरीराला, मनाला पुरेशी विश्रांती मिळत नाही.यामुळे आवडीचे काम करून मूड ठिक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असते. चीनमधील एक सुपरमार्केट चेन ‘फॅट डाँग लाइ’ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका वर्षात १० दिवसांची ‘सॅड लिव्ह’ देण्यात येत आहे, विशेष म्हणजे यासाठी मॅनेजरची परवानगी घेण्याची देखील आवश्यकता नाही.

या सुट्ट्यांबद्दल बोलतना या सुपरमार्केट चेनचे चेरमन यू डाँग लाइ म्हणाले की, आयुष्यात प्रत्येकजण कधीतरी दुःखी होतो, हा मानवी स्वभावाचा भाग आहे. आमच्या कंपनीतील कर्मचारी मूड खराब असेल तर १० दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. कर्मचारी त्यांना हवे तेव्हा सुट्टी घेऊ शकतात, यासाठी त्यांना मोकळीक देण्यात येते.

‘सॅड लिव्ह’ या कॉन्सेप्टबद्दल बोलताना यू यांनी सांगितलं की, जेव्हा कर्मचारी सॅड लिव्ह घेतात तेव्हा त्यांना लगेच प्रसन्न वाटू लागतं. याच्या माध्यमातून कंपनी त्यांच्या अडचणी समजून घेते आणि त्यांना पाठिंबा देते हा संदेश कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचतो. तसेच त्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांना हवे तेव्हा ही सुट्टी घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

यू यांनी पुढे बोलताना सांगितलं की, कर्मचारी ४० दिवसांपर्यात वार्षीक सुट्ट्या घेऊ शकतात. तसेच ककर्मचारी आठवड्यातून पाच दिवस काम करतात. या पाच दिवसात शिफ्ट सात तासांची असते. तसेच कर्मचाऱ्यांना काही खास परिस्थितींमध्ये ५,००० युआन पर्यंत भरपाई देखील देण्यात येते. यासोबतच चायनीज न्यू इयरनिमीत्त पाच दिवस सुपरमार्केट बंद असतं तेव्हा देखील कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. फॅट डाँग लाइ कंपनीत वर्क कल्चर इतरांपेक्षा वेगळं असून चीनच्या इतर कंपन्यांप्रमाने येथे 996 पॅटर्न फॉलो केला जात नाही. म्हणजेच कर्मचारी आठवड्याचे सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत काम करत नाहीत.

यू यांनी त्यांच्या सुपरमार्केट चैनमधील पहिलं स्टोअर १९९५ साली उघडलं होतं. त्यानंतर त्यांनी चीनच्या हेनान प्रोव्हेंसमध्ये याचा विस्तार केला असून सध्या त्यांचे १२ आउटलेट आहेत. फॅट डाँग लाय हे सुपरमार्केट जगभरातील इतर सुपरमार्केटप्रमाणे नसून येथे ग्राहकांची विशेष काळजी घेतली जाते. या सुपरमार्केटमध्ये ग्राहकांचे ब्लड प्रेशर तपासणे, हँडबॅग केअर यासोबतच पाळीव प्राण्यासाठी फिडींग स्टेशन देखील येथे देण्यात येतात. यासोबत मॅनिक्यूअर आणि बुट पॉलिश देखील करून दिलं जातं.

SL/ML/SL

15 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *