यापुढे सर्व शासकीय शाळांची वीज बिले सरकार भरेल
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सरकारी शाळांच्या थकीत वीज बीलापोटी आता यापुढे वीज पुरवठा खंडित करू दिला जाणार नाही, यापुढे ही सर्व बिले सरकारच भरेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली.Henceforth the government will pay the electricity bills of all government schools
प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला ते उत्तर देत होते, सुनील राणे यांनी तो उपस्थित केला होता, केवळ शाळाच नव्हे तर रुग्णालये , पाणी पुरवठा योजना देखील वीज खंडित होऊन थांबू नयेत अशी योजना करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली , यावर मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय केला जाईल असं मंत्री म्हणाले.
शाळा वीज पुरवठा खंडित करू नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याशी करार केला जाईल, त्यासोबत सौर ऊर्जा वापरण्याच्या सूचना ही देण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्याच्या फिची प्रतीपूर्तीची रक्कम म्हणून केंद्राकडून आतापर्यंत ८२५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत तर १२४ कोटी अद्याप येणं बाकी असल्याची माहिती केसरकर यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
ML/KA/PGB
23 Mar. 2023