दादरमध्ये दहीकाला उत्सवातून कॅन्सरग्रस्तांना मदत

मुंबई, दि १५: कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी, मुंबईतील एकमेव दहीहंडी म्हणून ओळखला जाणारा “दहीकाला उत्सव २०२५” यावर्षी दादर येथे उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत केशव दाते उद्यान, प्रा. आगाशे पथ, भवानी शंकर रोड, दादर (प.), मुंबई ४०००२८ येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भीमराव धुळप व यशवंत विचले (विधानसभा निरिक्षक, दादर) यांच्या पुढाकाराने होत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत आहे. या सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत.
आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “चला, आनंदसोहळ्यात सहभागी होऊन एका चांगल्या कार्याला हातभार लावूया!” दहीकाला फोडण्याच्या थरारासह, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक संदेश आणि एकतेचा उत्सव अशा विविध उपक्रमांनी हा दिवस संस्मरणीय ठरणार आहे. गोविंदा पथकासाठी पाच थर ५००/ सहा थर ११११/ देण्यात येणार एकूण बक्षीस २५१००० (दोन लाख एककावन हजार रुपये) ठेवण्यात आले आहे.यामधील उरलेली रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.KK/ML/MS