अवकाळी पावासाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत

 अवकाळी पावासाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसा संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करतोच आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितले.

वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेस
मध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहोत.

सध्या सुरू असलेल्या आमदार अपात्रता विषयावर बोलताना या संदर्भात मी काहीच बोलू शकत नाही. हे ज्यूडीशियल प्रकरण आहे आणि ट्रीब्युनलचा दर्जा त्या सुनावणीला आहे. त्यावर कमेंट करणे योग्य होणार नाही असे ते म्हणाले.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत बोलताना मी कालही सांगितले आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो, अजून आमची चर्चा व्हायची आहे, चर्चेनंतरच जागावाटप सूत्र ठरेल.. मात्र त्याचा आधार काय असेल, तर जो ज्या जागांवर लढला आहे, तो साधारणपणे त्या जागा लढवणार. मात्र हे एकदम static राहणार नाही, त्यात बदल होऊ शकतात असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. Help to farmers by forecasting unseasonal rains

ML/KA/PGB
27 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *