तुफानी पावसात भरकटलेले हेलिकॉप्टर रस्त्यावर उतरले

पुणे दि १९– लोणावळ्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावरच्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.
सालतर गावच्या मागील बाजूला मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे त्यावर उतरविण्यात आले.
बाजूलाच मुळशी धरणाचा जलाशय तर दुसऱ्या बाजूला जग प्रसिद्ध ॲम्बी व्हँलीचा प्रकल्प आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलेट, चार प्रवासी होते.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर अविनाश भोसले कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.ML/ML/MS