शिक्षकांचा सन्मान करणे हे माझे परम कर्तव्य, माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे

 शिक्षकांचा सन्मान करणे हे माझे परम कर्तव्य, माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे

मुंबई, दि २१
शिक्षक हा समाजाचा कणा असून उज्वल विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे उद्दिष्ट असते. अशा शिक्षकांचा सन्मान करणे हे मी माझे कर्तव्य समजतो असे जाहीर प्रतिपादन माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालय येथे नुकताच लायन्स इंटरनॅशनल च्या वतीने शिक्षकांचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या संख्येने उस्फुर्त प्रतिसाद लाभला. समाजातील विद्यार्थी घडवण्याचे अनोखे काम हे शिक्षक करत असतात या शिक्षकांप्रती माझ्या मनामध्ये आदळ आणि प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्याचा साधन म्हणजे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे. आम्ही दरवर्षी शिक्षकांना त्यांच्या कार्याचा बहुमोल असं सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करत असतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते एकदम घट्ट असते समाजातील विद्यार्थी घडवण्याचे आणि त्यांना आकार देण्याचे काम हे नेहमीच शिक्षक करत असतात. त्यांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याचं हे हक्काचं व्यासपीठातून दरवर्षी आम्ही या शिक्षकांचा सन्मान करतो. यापुढे देखील आम्ही शिक्षकांविषयी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवणार असल्याची ग्वाही लायन्स इंटरनॅशनल चे पदाधिकारी आणि माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांनी या कार्यक्रमात दिली.
डॉक्टर जगन्नाथ राव हेगडे हे समाजात नेहमीच चांगले कार्य करत असतात. त्यांनी वयाचे 75 वी काढली तरी त्यांचं समाजाविषयी प्रेम हे नेहमीच दिसून येत असतं. शिक्षकांच्या प्रति सन्मान करून त्यांनी एक मोठा विचार आणि प्रेरणा जगाला दिलेली आहे या प्रेरणेतून अनेक नामवंत विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येतील आणि समाजाविषयी अनेक कार्यक्रम घेऊन आपली उदारता दाखवतील असे जाहीर प्रतिपादन लहान इंटरनॅशनल च्या पदाधिकारी फाल्गुनी शेठ यांनी या कार्यक्रमातून केले.
डॉक्टर जगन्नाथ राव हेगडे यांचे कार्य आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. ते मुंबईचे नगरपाल असताना त्यांनी अनेक विविध सामाजिक शैक्षणिक कार्य केले होते. त्यांचे वय मोठे झाले तरी त्यांचे कार्य काय अजून संपत नाही. या वयात देखील ते समाजाप्रती कार्य करत राहतात ही फार अभिमानाची गोष्ट असल्याची माहिती शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांनी या कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांच्या भावना दाटुन आल्या होत्या. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर फिरोज कात्रक, डॉ प्रागजी वाझा, दिलीप वारेकर, समाजसेवा नितीन कोलगे, पत्रकार शेखर छत्रे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *