मुसळधार पावसामुळे शेती ची उडाली दाणादाण

छ. संभाजीनगर दि १४– कन्नड तालुक्यातील भीलदरी शाफियाबाद गावात काल सायंकाळी मुसळधार पाऊस पडला असून या पावसामुळे शेतीमध्ये सगळीकडे तळे साचले आहे. या परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरलेलं पीकही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्याचे शेतातील शेती उपयोगी साहित्यही वाहून गेले असल्याने या मुसळधार पावसामुळे शेतीची दाणादाण उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद, फुलंब्री व पैठण तालुक्यात ही रात्री जोरदार पाऊस पडला आहे.