जोरदार पाऊस: धरण क्षेत्रात अतिवृष्टी, दोन बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जून महिना संपला तरी पावसानं समाधानकारक हजेरी लावली नव्हती . परिणामी धरणपाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. मात्र काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं धरण पाणी साठ्यात वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे हळूहळू धरणाच्या आणि नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
आज पंचगंगा नदीची पाणी पातळी अचानक वाढल्यानं कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. त्या पाठोपाठ शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्यावर १६ फूट १०इंच पाणी पातळी आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्यानं कसबा बावडा, वडणगे, निगवे दुमाला वाहतूक बंद झाली आहे.
तसंच शिंगणापूर बंधाऱ्यावरील वाहतूकही बंद झाली आहे.मात्र नागरिक अशातही धोकादायकरित्या वाहतूक करीत आहेत.पेरणीच्या कामाला अजून समाधानकारक वेग आलेला नाही. सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्यानं ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा कसबा बावडा ते वडणगे मार्गावर बंधा-या वर अर्धा ते एक फूट पाणी आल्यानं या ठिकाणी बॅरेकेटिंग करून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ML/KA/SL
7 July 2023