वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

 वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शुक्रवारी दुपारनंतर सोलापूर शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले गेलेHeavy rain with strong winds.

नवी पेठ, जुळे सोलापूर , निराळे वस्ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचले गेले. सोसाट्याचा वारा असल्याने शहरातील अनेक ठिकाणची झाडे देखील रस्त्यावर कोसळली गेली. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे नागरिकांचे मात्र हाल झाले.

सोलापूर शहरासह जिल्ह्यात पंढरपूर ,सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, बार्शी अशा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामध्ये फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. पपई, द्राक्ष ,डाळिंब ,आंबा, केळी अशा फळबागा उध्वस्त झाले आहेत. तर कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मात्र वातावरणीय बदल होऊन, काही काळासाठी ग्रामीण भागातील नागरिक मात्र सुखावले गेले.

ML/KA/PGB
28 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *