वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस…आंब्याचे नुकसान

बीड दि ३१…मागील काही दिवसांपासून उकाडा जाणवत असून आज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबा पिकाला तसेच उन्हाळी भाजीपाला पिकाचे नुकसान होणार आहे. दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.