यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर
यवतमाळ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे असंख्य नदी नाल्यांना पूर आला आहे . तर दिग्रस शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीने या वर्षी पहिल्यांदाच पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनातर्फे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे.
ML/ML/SL
1 Sept 2024