औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस
औरंगाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे रब्बीतून काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा असतानाच, आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल रात्री आठ वाजेपासून पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.
काल सकाळपासूनच औरंगाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते.
संध्याकाळनंतर मात्र परिस्थिती आणखीनच बदलली. दरम्यान रात्री आठ वाजल्यानंतर जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून, हाती आलेल्या पीकांचं या अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे.
गंगापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाला दुपारी 1 वाजता सुरुवात झाली दहेगाव बंगला परिसरात रिमझिम पाऊस ,विजेचा कडकडाट ,शेंदूरवादा , सावखेडा परिसरात देखील वीस मिनिटांपासून जोरदार पाऊस झाला. पैठण तालुक्यातील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी परिसरात जोरदार पाऊस आहे.
वाळूज परिसरात देखील रिमझिम पाऊस झाला. पैठण परिसरात ढगाळ वातावरणाचा जोरदार वारा व पाऊस पडला. दौलताबाद परिसरात रिमझिम पाऊस पडला आहे. ढोरकीन येथे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. बालानगरसह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बाजार सावंगी परिसरात देखील पाऊस पडला आहे. तसेच पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे देखील पावसाचा जोर वाढला. तर सिल्लोड शहरासह तालुक्यात काही ठिकाणी रीम झिम पाऊस पडला आहे.
ML/KA/SL
25 Jan. 2023