धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस , पाच बंधारे पाण्याखाली

 धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस , पाच बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात रविवारपासून आज सकाळपर्यंत पावसानं जोर धरला असून कालपासून दिवसभर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून चार धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. तसंच राजाराम बंधाऱ्यासह पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.Heavy rain in the dam area, five dams under water

पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीची पातळी दीड फुटानं वाढली आहे.जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.राधानगरी,वारणा, दूधगंगा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून आज सकाळी सात वाजेपर्यंत राधानगरी धरणात 54.45% इतका पाणी साठा झाला आहे.

मध्यंतरी पावसानं दोन-तीन दिवस उसंत घेतल्यानं भाताची रोप लावणी खोळंबली होती. कालपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानं रोप लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात धांदल उडाली आहे.

ML/KA/PGB
18 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *