सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात रात्रभर पावसाची अखंड रिपरिप सुरूच आहे .अधून मधून जोरदार सरी पडत आहेत. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कर्ली आणि वाघोटन नदया इशारा पातळीवर वाहत आहेत. सर्व नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळा , महाविद्यालय ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था या सर्वांना आजसाठी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण सरासरी 216.5 mm पाऊस पडल्याची नोंद आहे सावंतवाडी येथे तालुक्यात सर्वात जास्त 270.5 mm पाऊस पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ एक पथक दाखल झाले असून सध्या कुडाळ पावशी येथे ठेवण्यात आलेले आहे. पुढील तीन तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
ML/ML/SL
7 July 2024