परभणीत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत….

परभणी दि १६ — जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे.पुर्णा तालुक्यात बानेगाव, माहेर,फूलकळस ,मुंबर ,देवूळगाव दु.,धानोरा काळे या पाच गावामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आलाय त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने काल दिवसभर वाहतूक बंद होती.

पुराच्या पाण्यामुळे सोयाबीन,कापूस, सह भाजीपाल्याचे आणि फळबागांचे शेती पिंकाचे मोठ नुकसानी झाल्या. अनेक शेतकऱ्यांचे ठिबक संचासह इतर साहित्य वाहून गेले आहे. झिरीफाटा पूर्णा मार्गावरील काल पासून पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गावरून वाहतूक न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर पूर्णा आणि गोदावरी नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत .

दरम्यान नुकसान ग्रस्त भागाची पाहणी गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे , गंगाखेड उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर , तहसीलदार एम.एन बोथीकर, तालुका कृषी अधिकारी भालेराव, नायब तहसीलदार थारकर यांनी पाहणी केली यावेळी कर्मचारी ,नागरिक शेतकरी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *