येत्या ४८ तासांत होणार धुव्वाधार पाऊस, या ठिकाणी अलर्ट जारी

 येत्या ४८ तासांत होणार धुव्वाधार पाऊस, या  ठिकाणी अलर्ट जारी

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले दोन दिवस वरुणराज राज्यभर अगदी मनसोक्त बरसून पंधरा दिवासांची तूट भरून काढत आहेत. यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आला असून संततधारेमुळे मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. येत्या ४८ तासांत देखील धुव्वाधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उद्या (दि. २७) राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुढच्या २४ तासांमध्ये नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

चार दिवसांपूर्वी कधी येणार, कधी येणार? अशी चर्चा असलेल्या मान्सूनन तीन दिवसाच्या आगमनातच दमदार एन्ट्री मारून हवामान खात्याला अलर्ट जारी करण्याची वेळ आणली आहे.

SL/KA/SL

26 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *