बीड, अंबाजोगाई,आष्टी, माजलगावसह अनेक भागात जोरदार पाऊस

 बीड, अंबाजोगाई,आष्टी, माजलगावसह अनेक भागात जोरदार पाऊस

बीड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेले होती, यामुळे पिके देखील करपत चाललेली होती. मात्र काल सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली, बीड ,अंबाजोगाई, आष्टी, माजलगावसह अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही गावाचा संपर्क देखील तुटला आहे.

नदी नाले ओसंडून वाहत आहेत. आष्टी तालुक्यातील शेतातून गावाकडे जात असताना शेतकऱ्याच्या दोन म्हशी वाहून गेल्या तर केज तालुक्यातील झोला येथील विशिष्ट अश्रूबा ढाकणे यांचा शेतात बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.

ML/KA/SL

24 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *