तळ कोकणात पावसाची जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे.
ML/ML/SL
3 June 2024