महाड परिसरामध्ये पुन्हा मुसळधार , शहरात पूर सदृश्य स्थिती.
महाड, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काल रात्री पासून महाड शहर , परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले असून महाड शहरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे १०४ पोलादपूर येथे १२० तर महाड येथे ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
याबरोबरच रायगड वाळण, वरंध या शेजारील भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाड शहराच्या सखल भागात दस्तुरी नाका भागात पुराचे पाणी रस्त्यावर येऊ लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. यासंदर्भात महाड नगरपालिका प्रशासन येणाऱ्या सर्व आव्हानांना मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा अग्निशमन दल प्रमुख गणेश पाटील यांनी दिली आहे. एनडीआरएफ चे पथकही सज्ज असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
ML/ML/PGB
31 July 2024