दुबईत पुन्हा मुसळधार पाऊस, अनेक विमान उड्डाणे रद्द

 दुबईत पुन्हा मुसळधार पाऊस, अनेक विमान उड्डाणे रद्द

दुबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एप्रिलच्या मध्यात मुसळधार पावसाच्या अनुभव घेतलेल्या युएईला काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करावी लागली. दोन आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारे मुसळधार पावसामुळे काही दिवस दुबई विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प झाली होती. विमानतळावर गुडघाभर पाणी साचल्याने विमानतळाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने अमिरातीमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा पुन्हा एकदा हाय अलर्टवर ठेवण्यात आली. गेल्या महिन्यात १४ आणि १५ एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसाने युएईतील बहुतांश भाग जलमय झाला. दुबईत तर १९४९ नंतरचा सर्वात विक्रमी पाऊस झाला.

गुरुवारी झालेल्या प्रलयंकारी पावसाचा शैक्षणिक संस्थांनाही फटका बसला. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेने सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी कार्यालयांनाही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनाही आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

SL/ML/SL

3 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *