मुसळधार पावसाने वस्तीगृहात पाणी; 80 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर…

 मुसळधार पावसाने वस्तीगृहात पाणी; 80 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर…

गडचिरोली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिरोंचांमध्ये काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे विद्यार्थी वस्तीगृहात पाणी शिरलं. पुराच्या पाण्यात अडकलेल्या छोट्या मुलांना सिरोंचां पोलिसांनी खांद्यावर घेऊन बाहेर काढलं. वस्तीगृहाच्या आतमध्ये आलेल्या पाण्यामुळे काही साप , विंचू ही आतमध्ये आले. मुलांना पाण्यातून बाहेर काढताना एका पोलिसांना साप चावल्याची देखील माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर याच गावात सूर्यापल्ली येथील काही घरांमध्येही पाणी गेले होते. तेथील नागरिकांना देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून सर्व सुरक्षित आहेत.

ML/ ML/ SL

19 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *