यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान

 यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान

यवतमाळ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही बसत आहे.यवतमाळ जिल्ह्यात आज आलेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे. अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे टिनपत्रे उडाली आहेत. टिनपत्रे उडाल्यामुळे एकाचा हात कापला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत.यवतमाळच्या आर्णी आणि महागांव तालुक्यात अचनाक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

आर्णी, महागांव तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग, खली मलकापूर या गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. चक्रीवादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. चक्रीवादळात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडत आहे. त्यामुळे आर्णीच्या पाभळ गावाला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्याचं बघायला मिळत आहे.

जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जामनेर तालुक्यातील कापूसवाडी, देऊळगाव, फत्तेपूर अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापूसवाडी येथे अवकाळी पावसामुळे तब्बल 3 बिगे केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. लागवडीसाठी कर्ज घेऊन तब्बल तीन लाखांचं खर्च आला. मात्र अवकाळी पावसामुळे लागवडीचा सुद्धा खर्च निघाला नाही. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळीची भाग जमीनदोस्त होऊन प्रत्येक शेतकऱ्याचं तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.

SL/ML/SL

26 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *