उष्माघात, निसर्गचक्र आणि पर्यावरणीय संकट

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्याचा चढा पारा हा आपल्या सगळ्यांना काही संदेश देऊ पाहतोय. ज्या नाशिकमध्ये ३५ अंशांच्या वर मे मध्ये तापमानाची नोंद होत नव्हती, तिथे आता एप्रिलमध्ये ४० अंशांवर पारा जातोय. Heatstroke, natural cycles and environmental crises
खानदेशात उन्हाच्या झळांची तशी सगळ्यांना सवय असली तरी देखील एप्रिलमध्ये ४३ अंशांच्या वर तापमानाची होणारी नोंद ही आगामी पर्यावरणीय संकटाची नांदी म्हणायला हवी. मे मध्ये खानदेशातील तापमान ४६ अंशांवर जाईल.
पृथ्वीवरील तापमान वाढीच्या संकटाकडे आणि वेगाने बदलणाऱ्या पर्यावरणीय संकटाकडे आता लक्ष द्यावेच लागणार आहे. हे मानवा, आता तरी आम्हा निसर्गाकडे पाहा, आमची काळजी घ्या…हेच जणू वाढता उष्मांक आपल्याला सांगतोय.
ML/KA/PGB
Sep 2023