दहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

नवी दिल्ली, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभरापासून देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याने आज जम्मू-काश्मीर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह ९ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला आहे. तर१० राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला.
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह पूर्व भारतात दिवसाचे तापमान किमान ५ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. १६ मार्च रोजी बिहार आणि झारखंडच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम राजस्थानसह संपूर्ण पश्चिम भारतात पुढील ४-५ दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते तर छत्तीसगडसह मध्य भारतात पुढील ३ दिवसांत कमाल तापमानात किमान २ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते आणि त्यानंतर तापमान स्थिर राहील.
पुढील एका आठवड्यात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार वारे आणि धुळीची वादळे येण्याची शक्यता आहे.
,