मुंबई मनपाच्या केईएम रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

 मुंबई मनपाच्या केईएम रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या KEM या रुग्णालयामध्ये हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण विभाग सुरू झाल्यापासून हृदयदात्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला गुरुवारी मेंदू मृतावस्थेमध्ये असलेल्या रुग्णाचे हृदय मिळाले. सुमारे दहा तास चाललेली ही अतिशय आव्हानात्मक हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे केईएम हे देशातील पहिले पालिका रुग्णालय ठरले आहे.

खासगी रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, KEM रुग्णालयामध्ये त्यासाठी सहा ते सात लाख रुपये खर्च आला. ‘ओपन हार्ट सर्जरी’ या गटामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण पूर्णपणे लागू झाल्यानंतर अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी अत्यंत कमी खर्च येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
अवयव प्रत्यारोपणासारख्या वैद्यकीय सुविधांचा लाभ सर्वसामान्यांनाही मिळायला हवा. त्याच उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आला. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, दात्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने हे आव्हान पेलणे शक्य झाले, असं सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले.

हृदयाच्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता हृदयप्रत्यारोपण सुरू करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय चमूची आवश्यकता होती. त्यासाठी हृदयविकारासंबंधी तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. उदय जाधव, डॉ. द्वारकानाथ कुलकर्णी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. तरुण शेट्टी यांच्यासह ५० जणांच्या चमूने हे आव्हान पेलले.

KEM रुग्णालयामध्ये १६ फेबुव्रारी १९६८ रोजी पहिल्यांदा हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, ती यशस्वी झाली नव्हती.

ML/ML/SL

14 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *